उदगीरात भाजपचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:12+5:302021-06-27T04:14:12+5:30

उदगीर : ओबीसी समाजाचे रद्द करण्यात आलेले आरक्षण परत मिळण्याच्या मागणीसाठी उदगीरात शनिवारी भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील ...

BJP's Chakkajam in Udgir | उदगीरात भाजपचा चक्काजाम

उदगीरात भाजपचा चक्काजाम

उदगीर : ओबीसी समाजाचे रद्द करण्यात आलेले आरक्षण परत मिळण्याच्या मागणीसाठी उदगीरात शनिवारी भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झाल्यामुळे पाच तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करुन आंदोलनाला सुरुवात झाली. भाजपचे प्रदेश चिटणीस व माजी आमदार गोविंद केंद्रे व माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून, हे सरकार विनाकारण केंद्र सरकारची बदनामी करत आहे, असे माजी आमदार गोविंद केंद्रे म्हणाले. या आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली.

या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, भाजप तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, बसवराज बिरादार कौळखेडकर, उषा रोडगे, ज्योतीताई राठोड, भगवानराव पाटील तळेगावकर, धर्मपाल नादरगे, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, पप्पू गायकवाड, दिलीप मजगे, अमोल निडवदे, दयानंद कांबळे, उदयसिंह ठाकूर, नागेश आष्टुरे, अमित बोळेगावे, शिवाजीअण्णा केंद्रे, वसंत शिरसे, मनोज पुदाले, ॲड. दत्ता पाटील, सावन पस्तापुरे, धनाजी कुमठेकर, बापुराव येलमट्टे, सोमेश्वर सोप्पा, विठ्ठल तिडके, बालाजी केंद्रे, नारायण मिरगे, लक्ष्मण फुलारी, रोहिदास गंभीरे, बाबासाहेब पाटील, भागवत गुरमे, संजय पाटील, बालाजी देमगुंडे, सुरेंद्र आकनगिरे, शंकरतात्या रोडगे, अंतेश्वर रोडगे, राम स्वामी कुसळकर, विश्वेश्वर स्वामी, ईरलाल कांबळे, कमलेश पेठे, सुधाकर बिरादार, शैलेश देमगुंडे, अरविंद नागरगोजे, विजय पाटील, प्रदीप जाधव, महिला आघाडीच्या उत्तराताई कलबुर्गे, अरुणा चिमेगावे, श्यामला कारामुंगे, मधुमती कानशेट्टे, उषा माने, वंदना गरड, शशिकला पाटील, शिवकर्णा अंधारे, संदेश खटके, नारायण पाटील, संदीप कुलकर्णी, आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॅनियल जाॅन व पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: BJP's Chakkajam in Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.