जिल्हाभरात भाजपचे चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:04+5:302021-06-27T04:14:04+5:30
अहमदपूर येथे भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, ...

जिल्हाभरात भाजपचे चक्का जाम आंदोलन
अहमदपूर येथे भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी सभापती दिलीपराव देशमुख, जि. प. सदस्य अशोक केंद्रे, जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखाताई तरडे, जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रा. हणमंतराव देवकते, पंचायत समिती सभापती गंगासागर जाभाडे, उपसभापती बालाजी गुट्टे, सदस्य राम नरवटे, कुलदीप हाके, बाळासाहेब होळकर, तालुका उपाध्यक्ष संतोष कोटलवार, परमेश्वर पाटील, सरचिटणीस प्रताप पाटील, दत्तात्रय जमालपुरे, बालाजी पडोळे, माधव मुंढे, रमेश कांबळे, गयाबाई शिरसाठ, गोविंद कांडनगिरे, विजय माने, अर्जुन गंगथडे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, श्याम यादव, ब्रह्मानंद सोनेवाड, साईनाथ गादेवार, रतन सौदागर, गोविंद बैकरे, बाबासाहेब कांबळे, नरसिंग कोंडलवाडे, कमलाकर शेकापुरे, चंदू पाटील, राम देवकत्ते, संग्राम मुंढे, दत्ता गोरे, जयश्री केंद्रे, कमलाकर पाटील, नाथराव केंद्रे, शरद जोशी, टोम्पे, अनंत गुट्टे, अमोल तरडे, ॲड. व्यंकट मुंढे ,आदी सहभागी झाले होते.