शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:51 IST

पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्यामुळे अनेकांची अडचण होणार

लातूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपमध्ये मोठी बंडाळी पाहायला मिळत आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवले असून, यामुळे पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे.

लातूर मनपासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. पक्ष नेतृत्वाने नाराजांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अनेक प्रभागांत इच्छुकांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्या या बंडखोरांमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.

राजकीय वर्तुळातील चर्चा..!बंडखोरांची मनधरणी करण्यात वरिष्ठ नेत्यांना अपेक्षित यश आलेले नाही. आता ही बंडखोरी शमवण्यासाठी पक्ष आगामी काळात कोणती ठोस भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनीच अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करूनही डावलले गेल्याची भावना या इच्छुकांनी व्यक्त केली आहे. याअंतर्गत कलहामुळे अधिकृत उमेदवारांना आता केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच पक्षातील नाराजांशीही लढावे लागणार आहे. दरम्यान, आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसतो आणि पक्ष यावर कशी मात करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion Challenges BJP in Latur; Independents Increase Candidate Worries

Web Summary : Latur BJP faces internal rebellion as many denied tickets remain independent. This division threatens official candidates, potentially benefiting opposition. Senior leaders are struggling to quell dissent, raising concerns about the party's future strategy and the impact on election results.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६