जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:40+5:302021-06-26T04:15:40+5:30

कोरोनाच्या संकटामुळे राजकारण नको म्हणून, भाजप पक्ष शांत होता. मात्र, आता शांत बसणे शक्य नाही. सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्याची ...

BJP is able to bring justice to the people | जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप सक्षम

जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप सक्षम

कोरोनाच्या संकटामुळे राजकारण नको म्हणून, भाजप पक्ष शांत होता. मात्र, आता शांत बसणे शक्य नाही. सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर सर्व बाबी मांडल्या जातील. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप सर्व ताकदीने लढेल. आघाडी सरकारच्या सर्व कार्यक्रमावर बहिष्कार टाकून जनता व शेतक-यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. लातुरातील होणारे आंदोलन राज्यासाठी दिशादर्शक ठरावे, याकरिता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यु पवार तसेच पक्षात प्रवेश केलेले दिलीपराव देशमुख, किरण उटगे, ॲड. शितल पाटील यांचीही भाषणे झाली. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ. विनायक पाटील व प्रदेश सचिवपदी अरविंद पाटील-निलंगेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय दोरवे यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.

Web Title: BJP is able to bring justice to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.