शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

लातूर जिल्ह्यातील हडोळती टोलनाक्यावर विचित्र अपघात, ट्रॅव्हल्स, जीप, टेम्पोची धडक; ९ जखमी, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 00:18 IST

शिरूर ताजबंद-मुखेड मार्गावरील हडोळती गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळील उमरगा रेतू पाटीनजीक जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती देगलूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २४ एबी ९८७७ ला समोरून जोरात धडकली. याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो जीपवर आदळला. (travels, jeep, tempo accident)

लातूर (अहमदपूर / हडोळती) - अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोलनाक्याजवळ टेम्पो, ट्रॅव्हल्स आणि जीपचा विचित्र अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. अपघातानंतर, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली. यानंतर जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. (Bizarre accident at Hadolati toll plaza in Latur district, 9 injured, two serious)

शिरूर ताजबंद येथून जीप क्र. एमएच २६ एके २७७७ ही मुखेडकडे जात होती. या जीपच्या पाठीमागे किराणा साहित्य भरलेला टेम्पो क्र. एचएच २६ एच ४२५१ होता. दरम्यान शिरूर ताजबंद-मुखेड मार्गावरील हडोळती गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळील उमरगा रेतू पाटीनजीक जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती देगलूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २४ एबी ९८७७ ला समोरून जोरात धडकली. याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो जीपवर आदळला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात घडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्र व अहमदपूरला पाठविले. या अपघातामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थ, पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

गंभीर जखमींना लातूरला हलविले...अपघातात दिपक जाधव, रवी बाबुराव वळसे, अनिल गायकवाड, शिवराज जाधव, विजू कांबळे, अशोक शेटकार, वेदांत मोचे, ज्ञानोबा वाघमारे, द्रोपदबाई वाघमारे हे जखमी झाले आहेत. यातील दोघेजण गंभीर आहेत. जखमींना अहमदपूर व लातूरला हवलिवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी