लातूर शहरात झाडांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:16+5:302021-07-28T04:21:16+5:30
लातूर शहरातील राजीव गांधी चाैकात वड, पिंपळ यासह इतर झाडे लावण्यात आली होती. दरम्यान, या झाडांना पाच वर्षांचा कालावधी ...

लातूर शहरात झाडांचा वाढदिवस साजरा
लातूर शहरातील राजीव गांधी चाैकात वड, पिंपळ यासह इतर झाडे लावण्यात आली होती. दरम्यान, या झाडांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झाडांना फुगे बांधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वृक्ष लावणे सोपे आहे. मात्र, त्यांचे संवर्धन करणे अवघड आहे. आपण संवर्धनाला प्राधान्य दिले, तर लावलेले झाड माेठे हाेते. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देत हजारो झाडे जगविली आहेत. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कोअर कमिटीचे अध्यक्ष उमाकांत मुंडलीक, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, अध्यक्ष ॲड.अजित चिखलीकर, वृक्षलागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर यांच्यासह राजीव गांधी टॅक्सी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
अशी जगविली झाडे...
लातूर शहरात २०१६ मध्ये पाण्याचा माेठा दुष्काळ हाेता. अशा स्थितीत आहे त्या पाण्यातून पाण्याची बचत करत ते झाडांना देण्यात आले. यातून झाडे जगविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. राजीव गांधी चौकात लावलेल्या झाडांना गटारीतील पाण्याचा वापर करत जगविण्याचा प्रयत्न केला. यासाठी टॅक्सी युनियनचे पदाधिकारी आणि वसुंधरा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले आहेत.