सहकारमहर्षी चंद्रकांत वैजापूरे यांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:09+5:302021-08-27T04:24:09+5:30
या कार्यक्रमाचे आयोजन चंदरअण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, अंजलीताई केंद्रे, ...

सहकारमहर्षी चंद्रकांत वैजापूरे यांचा वाढदिवस साजरा
या कार्यक्रमाचे आयोजन चंदरअण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, अंजलीताई केंद्रे, बन्सीलालजी कांबळे, श्रीकांत पाटील, जवाहरलाल कांबळे आदी उपस्थित होते, तसेच उदगीर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन झाले. विकासनगरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ६६ जणांनी रक्तदान केले. त्याचबरोबर गरजू १० कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांच्या मदतीचे वाटप चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. संग्राम स्मारक विद्यालयात वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रकांतआण्णा वैजापुरे यांना शहर व परिसरातील राजकीय, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, प्रतिष्ठित व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, बस्वराज पाटील कौळखेडकर, गुंडप्पा पटणे, चेतन वैजापुरे, राजकुमार बिरादार बामणीकर, विश्वनाथ बिरादार माळवाडीकर, राहुल पाटील मलकापूरकर, रोहित मुक्कावार, रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रदीप विरकपाळे, सिद्धेश्वर पटणे, धोंडिबा सुगावकर, ज्ञानोबा मुंढे, संतोष सूर्यवंशी, कल्याण बिरादार, सुरज वैजापुरे, रमेश खंडोमलके, हरिश्चंद्र वट्टमवार, सुंदाळे, आशिष हंगरगे, फैजुखाँ पठाण, मंजुखाँ पठाण, सुवर्णकार, खिंडीवाले, तुकाराम शिंदे आदी उपस्थित होते. (वा.प्र.)