बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:48+5:302021-08-20T04:24:48+5:30
हॉटेलसमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास लातूर : शहरातील हॉटेल तुळशी, औसा रोडसमोर पार्किंग केलेल्या एम.एच.२४ सी.बी. ६४०८ या ...

बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरीला
हॉटेलसमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास
लातूर : शहरातील हॉटेल तुळशी, औसा रोडसमोर पार्किंग केलेल्या एम.एच.२४ सी.बी. ६४०८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत अविनाश मनोज जाधव (रा. औसा रोड, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास करीत आहेत.
प्लॉटवर येण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : औसा तालुक्यातील भुसणी येथे प्लॉटवर येण्याच्या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून बळजबरीने अडवून चपलाने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत यशवंत ग्यानबा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरालाल प्रल्हाद मोरे व अन्य एकाविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तू प्लॉटवर आल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद असून पोहेकॉ लामतुरे पुढील तपास करीत आहेत.
खोरे गल्ली येथून दुचाकीची चोरी
लातूर : शहरातील खोरे गल्ली येथे घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत सय्यदनगरतुल्ला अजमततुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एम.एच. २४ आर.४८७६ असा दुचाकीचा क्रमांक असून चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
वाहन चालविताना लोकांच्या जीवितास धोका; गुन्हा दाखल
लातूर : लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा स्थितीने झिगझॅग पद्धतीने भरधाव वेगात वाहन चालविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक युवराज रामगीर गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच.२४ ए.टी. ३०१२ या क्रमांकाच्या वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपो सई जगताप करीत आहेत.