भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप शिंदे | Updated: August 30, 2023 11:55 IST2023-08-30T11:55:34+5:302023-08-30T11:55:49+5:30
या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील परचंडा पाटीजवळ भरधाव वेगातील कारने दुचाकीस जोराची धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून किनगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर-अंबाजोगाई रोडवरील परंचडा पाटीजवळ चालकाने ( क्रमांक एमएच २४ व्ही ६८४८) कार निष्काळजीपणे चालवून दुचाकीस्वार मोकिंद उत्तम जाधव (वय ३९ रा. हिराबोरी तांडा. ता.लोहा) यांच्या दुचाकीस ( क्रमांक एमएच २६ बीएम २५५८ ) समोरुन जोराची धडक दिली.
यात मोकिंद जाधव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी उत्तम रुपला जाधव यांच्या तक्रारीवरुन कारचालकाविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.