प्रदुषणमुक्तीसाठी उदगीरात आज सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:43+5:302021-01-17T04:17:43+5:30
रविवारी सकाळी ८ वा. एक पॅडल आरोग्य, पर्यावरण व भविष्यासाठी या निर्धाराने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ...

प्रदुषणमुक्तीसाठी उदगीरात आज सायकल रॅली
रविवारी सकाळी ८ वा. एक पॅडल आरोग्य, पर्यावरण व भविष्यासाठी या निर्धाराने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली.
या सायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून होणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून माझी वसुंधरा अभियान, स्वतः एक दिवस पेट्रोल, डिझेल गाड्या न वापरण्याची शपथ घेत एक दिवस सायकलने प्रवास करण्याची मोहीम प्रभाविपणे राबविली आहे. पर्यावरण, आरोग्य व प्रदूषणमुक्तीसाठी सायकल रॅलीचेही आयोजन केले आहे.
उदगीर शहराची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल व्हावी म्हणून ही रॅली नगर परिषद कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक, उमा चौक ते मुक्कावार चौक, आर्य समाज चौक ते चौबारा, किल्ला असा मार्ग असणार आहे. शहरातील नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी राठोड यांनी केले आहे. यावेळी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्याची साफ-सफाईही करण्यात येणार आहे. तसेच कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.