पर्यावरण, प्रदूषणमुक्तीसाठी जळकोटात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:02+5:302021-02-08T04:18:02+5:30
उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी व मुख्याधिकारी भरत राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. सायकल रॅलीमध्ये शहरातील ...

पर्यावरण, प्रदूषणमुक्तीसाठी जळकोटात सायकल रॅली
उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी व मुख्याधिकारी भरत राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. सायकल रॅलीमध्ये शहरातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, मुख्याधिकारी भारत राठोड यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून हनुमान मंदिर, गुरुदत्त विद्यालयमार्गे मार्केट यार्डातून नगरपंचायत कार्यालय परिसरात पोहोचली. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, उस्मान मोमीन, महेश धुळशेट्टे, सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, सुभाष बनसोडे, राजू डांगे, संग्राम नामवाड, ओमकार धुळशेट्टे, माधव होनराव, मुक्रम बंडे, बाळू देवशेट्टे, धनंजय भ्रमण्णा, राहुल किडे, कपिल पाटील, पिराजी कोकणे, ललिताबाई गायकवाड यांच्यासह प्रशासन अधिकारी विघ्नेश मुंडे, मजीद शेख, केशव पिनाटे, स्वरूप चिरके, बागवान, सरूबाई चव्हाण, अनंत कांबळे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी मांडल्या अडचणी...
उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी नागरिकांची भेट घेऊन शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होत नाही. हातपंप बंद आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशा तक्रारी मांडल्या. तेव्हा मेंगशेट्टी यांनी नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना समक्ष बोलावून घेऊन तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या. दिवसेंदिवस वायुप्रदूषण वाढत आहे. वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी सायकलचा वापर करावा. यापुढेही महिन्यातून किमान एक दिवस नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येतील, असे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सांगितले.