कासारशिरसी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:20+5:302021-06-22T04:14:20+5:30
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, आ. अभिमन्यू पवार, अजित माने, सुनील उटगे, बाजीराव पाटील, ...

कासारशिरसी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, आ. अभिमन्यू पवार, अजित माने, सुनील उटगे, बाजीराव पाटील, धनराज होळकुंदे, देविदास काळे, शिवकुमार चिंचनसुरे, ज्ञानेश्वर वाकडे, पं.स. सदस्य शहाजहान बागवान, रमेश जाधव, नारायण इंगळे, ओम बिराजदार, जिलानी बागवान, कल्पना ढविले, संजय जेवरीकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, मनरेगांतर्गत औसा मतदारसंघात विविध विकास कामांसह ६०० किमी लांबीचे पाणंद रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३० फूट रुंद पाणंद रस्त्याच्या डांबरीकरणाची योजना आहे. कासारशिरसीला तालुक्याचा दर्जा देण्याचे माझे प्रमुख उद्दिष्ट असून, माझा आमदार निधी हा शेतकऱ्यांच्या विकासासाठी राहणार आहे.
याप्रसंगी आ. रमेश कराड म्हणाले, आ. अभिमन्यू पवार हे मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदारसंघात वृक्षारोपणावर भर द्यावा. माजी आ. पाशा पटेल म्हणाले, वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी वृक्ष लागवडीचा वसा घ्यावा, असेही ते म्हणाले.