देवनगरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:08+5:302021-08-18T04:26:08+5:30

विळेगाव येथे सुरू होणाऱ्या देवनगरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा सात हजार शेतकरी सभासदांचा टप्पा पूर्ण झाला असून, उर्वरित तीन हजार ...

Bhumipujan of Devnagari Agro Producer Company | देवनगरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे भूमिपूजन

देवनगरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे भूमिपूजन

विळेगाव येथे सुरू होणाऱ्या देवनगरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा सात हजार शेतकरी सभासदांचा टप्पा पूर्ण झाला असून, उर्वरित तीन हजार शेतकरी सभासद लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देवनगरीच्या संचालकांनी भूमिपूजन सोहळ्यात बोलताना व्यक्त केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक मलिकार्जुन मानकरी, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.सी.एल.चे संचालक किशोर राठोड व अनंत अचवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित बेळकुणे, सरपंच नरसाबाई रणदिवे, एम.पी.ओ.चे सचिन धरणे यांची उपस्थिती होती. प्रारंभी देवनगरी ॲग्रो प्रोड्युसर प्रकल्पाची रूपरेषा चेअरमन डॉ. अरविंद भातांब्रे यांनी प्रास्ताविकातून मांडली. यावेळी अनंत अचवले, किशोर राठोड, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर व मलिकार्जुन मानकरी यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी आ. धर्माजी सोनकवडे, व्हाइस चेअरमन राजकुमार हुडगे, गजानन भोपणीकर, नागेश जीवने, वैजनाथ लुल्ले, अशोक लुल्ले, अनंत पाटील टाकळीकर, गणपत पाटील आदींसह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनू डगवाले, संगमेश्वर महाराज वलांडीकर यांनी केले. यशस्वीतेसाठी देवीदास बेळकुंदे, महादेव कोटे, शरद हुडे, विशाल फुलारी, अरुण पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Bhumipujan of Devnagari Agro Producer Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.