तळेगाव भोगेश्वर येथे तीर्थक्षेत्र स्थळाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:52+5:302021-09-13T04:19:52+5:30

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगाणा या सीमावर्ती दक्षिण भारतातील राष्ट्रीय संत शिरोमणी गुरू रविदास महाराज पाचवे धाम व भारतातील ...

Bhumi Pujan of the pilgrimage site at Talegaon Bhogeshwar | तळेगाव भोगेश्वर येथे तीर्थक्षेत्र स्थळाचे भूमिपूजन

तळेगाव भोगेश्वर येथे तीर्थक्षेत्र स्थळाचे भूमिपूजन

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगाणा या सीमावर्ती दक्षिण भारतातील राष्ट्रीय संत शिरोमणी गुरू रविदास महाराज पाचवे धाम व भारतातील पहिले पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळाचे भूमिपूजन रविवारी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकउन्नती बहूउद्देशीय शि.प्र. मंडळ तळेगाव भोगेश्वर यांच्या मालकीच्या ३ एकर जमिनीवर विकसित करण्यात येणार आहे. या पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळाचे भूमिपूजन सत्संग सोहळ्याचे अखिल भारतीय गुरू रविदासिया धर्म संघटन अध्यक्ष संत श्री सुखदेव महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बबनराव घोलप होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्याणी ओंकारसिंग पंजाब, हभप मुक्ताई माउली श्री शेत्र खेर्डा, बाळकृष्ण महाराज पंढरपूर, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, रेणापूर पंचायत समिती सभापती रमेश सोनवणे, शिवाजीराव लकवाले, नगर परिषद सदस्य गणेश गायकवाड, दीपक कांबळे, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. भगवान गायकवाड, गोपाळ सूर्यवंशी, दीपक कांबळे, मलबा घोणसे, विश्वनाथ उदबाळे, राजेंद्र संघेकर, धर्माजी उदबाळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Bhumi Pujan of the pilgrimage site at Talegaon Bhogeshwar