जळकोटात बालाजी मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:09+5:302021-07-14T04:23:09+5:30

अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती ...

Bhumi Pujan of construction of Balaji Temple Hall in Jalkot | जळकोटात बालाजी मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

जळकोटात बालाजी मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, ॲड. तात्या पाटील, नगरसेवक शिवानंद देशमुख, माजी जि.प. सदस्य चंदन पाटील, मंदिर कमिटीचे रमाकांत रायवार, मारुती गबाळे, कृष्णा कोटलवार, व्यंकटराव कोडगिरे, प्रशांत देवशेट्टे, लक्ष्मीकांत गबाळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, वीरभद्र कोंडगिरे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, जळकोट तालुक्यातील तिरुपती बालाजी मंदिरासाठी आपण निधी जाहीर केला होता. त्याची पूर्तता आज होत असून बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही. स्थानिक विकास निधीतून १५ लाखांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. जळकोट नगरपंचायतीची सत्ता आमच्या हाती द्यावी. शहराचा कायापालट करू, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन संग्राम गायकवाड यांनी केले. आभार वीरभद्र कोटगिरी यांनी मानले.

Web Title: Bhumi Pujan of construction of Balaji Temple Hall in Jalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.