भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:58+5:302020-12-08T04:16:58+5:30
अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक पी. एन. डांगे, रामलिंग तत्तापुरे, ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक पी. एन. डांगे, रामलिंग तत्तापुरे, लक्ष्मण फड, एस. आर. सूर्यवंशी, संतोष पाटील, बबन गोरगिळे, मोहन कांबळे, महेश मठपती आदी उपस्थित होते.
हाळी हंडरगुळी येथे अभिवादन
उदगीर तालुक्यातील हाळी येथील तक्षशीला बुद्ध विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हरिश्चंद्र कांबळे, पी. एम. मसुरे, दयानंद कांबळे, सिद्धार्थ मसुरे, गौतम कांबळे, कुमार मसुरे यांची उपस्थिती होती. हंडरगुळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सभापती कल्याण पाटील, किशन कांबळे, रवी मसुरे, प्रदीप सोनकांबळे, स्वप्निल कांबळे आदी उपस्थित होते.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, बालाजी पाटील आनंदवाडीकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, प्रा. आर. एन. जाधव आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी केले. आभार प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी मानले.
उदगीरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष माधव कांबळे कल्लुरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आम्रपाली कांबळे, प्रतिभा कांबळे, आदित्य कल्लुरकर, स्नेहल कल्लुरकर, पुष्पा फिरंगे आदींची उपस्थिती होती.
उदगीर येथील संभाजी ब्रिगेडच्या तालुका शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार माने, उपाध्यक्ष कपिल शिंगडे, शशिकांत खटके, संघटक जितेंद्र मादलापूरकर, देवाभाऊ घंटे आदींची उपस्थिती होती.
उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द येथील चंद्रमणी बौद्ध विहार व आदर्श सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सपोनि. बाळासाहेब नरवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य रऊफ शेख, नागनाथ सोमवंशी, गौतम सोमवंशी, नागेश गोटमुकले, राजकुमार तोंडारे, तुकाराम सोमवंशी, प्रदीप सोमवंशी, पंकज सोमवंशी, सचिन कोंगे, रवी कुंडिले, प्रल्हाद सोमवंशी, विद्यासागर सोमवंशी, मारुती भिंगोले, बळीराम सोमवंशी, मंगेश गोटमुकले, प्रमोद सोमवंशी, बाबू सोमवंशी, बाबासाहेब सोमवंशी, भीमराव सोमवंशी, विश्वनाथ सोमवंशी, वैभव सोमवंशी, अक्षय सोमवंशी, दीपक सोमवंशी, धनराज सोमवंशी, अनिल सोमवंशी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विनायक सोमवंशी यांनी केले. आभार इरशाद शेख यांनी मानले.