बेराेजगारांनाे सावधान... डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकताे गंडा..।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:41+5:302021-07-15T04:15:41+5:30
अशी केली जाते फसवणूक... साेशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना गंडा घालण्याचे माेठे रॅकेट सक्रिय असल्याचे समाेर आले आहे. निनावी माेबाईल ...

बेराेजगारांनाे सावधान... डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकताे गंडा..।
अशी केली जाते फसवणूक...
साेशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना गंडा घालण्याचे माेठे रॅकेट सक्रिय असल्याचे समाेर आले आहे. निनावी माेबाईल क्रमांकावरून फाेन करायचे, तुम्हाला लाॅटरी लागली आहे. ती वस्तू साेडवून घेण्यासाठी, शासनाचा कर म्हणून तुम्हाला १० ते १५ हजार आधी भरावे लागतील. अशी बतावणी करून फसविले जाते.
बेराेजगार तरुणांना विविध आमिषे दाखवत जाळ्यात ओढले जाते. त्यातून मग वेबसाइट आणि माेबाईल क्रमांक दिला जाताे. यावर संपर्क साधा, अधिक माहिती मिळेल म्हणून सांगितले जाते. अशावेळी तरुण दिलेल्या माेबाईल क्रमांकावर फाेन करतात, वेबसाइट ओपन करतात. यावेळी त्यांचा महत्त्वाचा डाटा लीक हाेताे आणि त्यातून फसवणूक हाेते.
बनावट नियुक्तिपत्र देऊन लाखाे रुपयांना फसविल्याच्या घटना लातूर जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. तरुणाला वाटते आपल्याला थेट मंत्रालयातून नियुक्तिपत्र मिळाले आहे. नियुक्तिपत्रातील दिलेल्या कार्यालयात रुजू हाेण्यासाठी गेल्यानंतर समजते, आपली फसवणूक झाली. त्यावेळी खूप वेळ निघून गेलेली असते, पाेलिसांत धाव घेण्याशिवाय पर्याय नसताे.
ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी...
काेराेना काळात सध्या ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांनी व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. आपण ज्यांच्याशी व्यवहार करत आहाेत, त्याबाबत परिपूर्ण माहिती असण्याची गरज आहे. साेशल मीडियातून काेणी आमिष दाखवित असेल तर खातरजमा करावी, मगच व्यवहार करावा.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर