‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:14+5:302021-06-03T04:15:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : विविध मोबाईल कंपन्यांकडून व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. २४ तासांत तुमचे सिम ब्लाॅक होईल, असे मेसेज ...

Beware of 'SIM Verification Pending' message! | ‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान !

‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान !

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : विविध मोबाईल कंपन्यांकडून व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. २४ तासांत तुमचे सिम ब्लाॅक होईल, असे मेसेज पाठवून, मोबाईलधारकांना फसविण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. या माध्यमातून काहीजणांची फसवणूक झाल्याची तक्रारही सायबर सेलकडे तपासासाठी दाखल झाली आहे.

सोशल मीडियाचा वापर करून हनिट्रॅपसारख्या घटना घडवून आणल्या जात आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांकडून बोलतो, असे सांगत सविस्तर माहिती विचारली जाते. त्यातून बँक खात्यातील रक्कम परस्पर लंपास केली जाते. आता ‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज पाठविला जात आहे. मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीला थेट संपर्क केला जात आहे. यातून त्यांची फसवणूक केली जात आहे. ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. त्यापाठोपाठ पैशाची मागणी केली जात आहे. समोरून महिला अथवा मुली बोलत असल्याने काही मोबाईलधारक या बोलण्याला बळी पडत आहेत. वारंवार पोलीस प्रशासनाच्या सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा दिला जात आहे. मात्र गोड बोलण्याला अनेकजण बळी पडत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सायबर सेलकडे २०१९-२० आणि २०२१ या अडीच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पोलीस आणि सायबर सेल अशा गुन्ह्यांचा तपास करीत आहे.

ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी...

आपल्या मोबाईलवर मेसेज येतो. अमुक अमुक ॲप डाऊनलोड करा, असे सांगितले जाते. अशा वेळी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. या ॲपची गरज आणि त्यातून आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.

असा काॅल, मेसेज आल्यास मोबाईलधारकांनो, सावधान...

आपल्या मोबाईलवर निनावी क्रमांकावरून मेसेज आला असेल तर याबाबत अधिक जागरूकपणे खातरजमा करावी. त्यानंतरच त्याला रिप्लाय द्यावा. बहुतांश वेळा चुकीचे मेसेज आणि काॅल येतात.

व्हेरिफिकेशनच्या नावाखाली विचारण्यात येणारी माहिती, करण्यात येणारा काॅल आपली फसवणूक करणारा असू शकतो. यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायला बाळगावी.

फेक अकाऊंटवरून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग अथवा मैत्री करणे आपल्याला महागात पडू शकते, हे टाळण्यासाठी दक्ष राहावे.

अशी घ्या काळजी...

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारचे आमिष दाखविणारे फेक मेसेज व्हायरल केले जातात. त्या मेसेजमध्ये ई-मेल, मोबाईल नंबर दिले जातात. तेव्हा एखादी व्यक्ती सहज बळी पडते आणि संबंधित नंबर, ई-मेलवर संपर्क साधतो, तेव्हा समोरून गोड बोलले जाते. त्यानंतर बँकिंगबाबत, इतर माहिती मागितली जाते, अशा वेळी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

एखाद्या बँकेतून ग्राहकांना फोन करून माहिती मागविली जाते, हे चुकीचे आहे. मात्र बँकेचा हवाला देत आपण शाखाधिकारी आहोत, अशी बतावणी केली जाते. तुमचे बँक खाते अपडेट करायचे आहे, असे सांगून फसवणूक केली जाते. शिवाय, सोशल मीडियातून फेक मेसेज व्हायरल करून मोबाईलधारकांची फसवणूक केली जाते. पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: Beware of 'SIM Verification Pending' message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.