फेसबुकवर अनाेळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान, ‘हॅनी ट्रॅप’ वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:23+5:302021-06-11T04:14:23+5:30
लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांत साेशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी तक्रारी दाखल आहेत़. सध्या फेसबुकच्या माध्यमातून अनाेळखी ...

फेसबुकवर अनाेळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान, ‘हॅनी ट्रॅप’ वाढले!
लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांत साेशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी तक्रारी दाखल आहेत़. सध्या फेसबुकच्या माध्यमातून अनाेळखी ‘सुंदरी’कडून चॅटिंग करण्याच्या घटना वाढल्या आहेत़. पहिल्यांदा गाेडी-गुलाबीने चॅटिंग करणे, त्यानंतर पैशाची मागणी करण्याच्या घटना घडल्या आहेत़ शिवाय, व्हिडिओ चित्रीकरण करणे, ते साेशल मीडियात व्हायरल करणे़, नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत मानसिक त्रास देणे, या घटना तक्रारदारांसोबत घडल्या आहेत़. हॅनी ट्रॅपच्या माध्यमातून हळूवारपणे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक शाेषण केल्याचेही समाेर आले आहे. या घटनांचा तपास सायबर सेल करत आहे़. काही घटनांतील आराेपींच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना यश आले आहे़.
व्हिडिओ चित्रीकरणातून ब्लॅकमेलिंग
साेशल मीडियात प्रारंभी ओळख झाली़. यातून मैत्री अधिक घट्ट झाली़. त्यानंतर रोज चॅटिंग सुुरू झाले़. या महिलेने आपल्याला विश्वासात घेतले़. यातूनच विषय पुढे वाढत गेला़. व्हिडिओ चित्रीकरण कधी झाले, हेच समजले नाही़. कालांतराने या महिलेने मग पैशाची मागणी केली़. यातून सतत ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढला़. अखेर त्रस्त झाल्यानंतर पाेलिसात धाव घेतली़. त्यानंतर या घटनेतील महिला व साथीदार पुरुषाविराेधात गुन्हा दाखल झाला़.
प्रेमाचा बनाव करत पैशाची मागणी
फेसबुक आणि साेशल मीडियातून पहिल्यांदा ओळख झाली़. त्यातूनच राेज चॅटिंगचा प्रकार वाढला़. रात्री उशिरापर्यंत किंबहुना पहाटेपर्यंत चॅटिंग आणि माेबाईलवर बाेलणे हाेत असत़. व्हिडिओ काॅलही व्हायचे. यातून समाेरच्या व्यक्तीने प्रेमाचे नाटक केल्याचे लक्षात आले नाही़. खाेट्या प्रेमाला बळी पडून १ लाख २५ हजार रुपये त्याच्या बॅंक खात्यावर जमा केले़. त्यानंतर अचानक बाेलणे, संपर्क थांबविला़. यातून संशय बळावला, चाैकशीतून फसवणूक झाल्याचे समाेर आले़.
अशी झाली खाेट्या प्रेमातून फसवणूक
ती मुंबईच्या मायानगरी राहणारी़. फेसबुकवरून मैत्री झाली़. प्राेफाईलवरील सुंदर फाेटाे पाहून चॅटिंगचा माेह आवरता आला नाही़. यातूनच एका अनाेळखी सुंदरीशी चॅटिंग सुरू झाले़. पुढे-पुढे मग तिचा हट्ट पुरविण्यासाठी प्रयत्न केले़. टप्प्या-टप्प्याने पैसेही सुंदरीच्या बॅंक खात्यावर जमा केले़. पैशांची मागणी वाढत गेली़. नाही दिले, तर तुमचे व्हिडिओ आणि फाेटाे व्हायरल करण्याची धमकी दिली़. खाेट्या प्रेमातून तब्बल ५ ते ६ लाखांला चुना लागला़. हॅनी ट्रॅपमध्ये कधी अडकलाे, हे समजलेच नाही़.