शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सावधान! लातूरात कचरा जाळणाऱ्यांवर मनपाच्या चार पथकांची नजर

By हणमंत गायकवाड | Published: March 26, 2024 7:24 PM

स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथक

लातूर : लातूर शहरात कचरा जाळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मनपा आयुक्तांनी शहरातील चारही झोनमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकांची नियुक्ती केली आहे. सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत चारही झोनमध्ये पथकांचा फेरफटका राहणार आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून चारही झोन मध्ये पथकांची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत बारा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच लोकांकडून पुन्हा कचरा जाळल्याची पुनरावृत्ती झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. चारही झोनमध्ये प्रत्येकी तिघांकडून पाचशे रुपये असे एकूण बारा व्यक्तींकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड कचरा जाळल्यामुळे वसूल करण्यात आला आहे.

लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात आगीच्या ज्या घटना घडल्या आहेत. त्यात निम्म्यापेक्षा अधिक कचरा जळाल्याच्या घटना आहेत. यामुळे प्रदूषण होते. म्हणून महापालिकेच्या आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांचे पथक नियुक्त केले आहे. चारही झोनला स्वच्छता निरीक्षकांचे पथक असून त्यात तिघांचा समावेश आहे. या पथकाचा फेरफटका प्रत्येक झोनमध्ये सकाळी आणि सायंकाळी दररोज होत आहे.

स्वच्छता निरीक्षकांचे क्षेत्रनिहाय पथक... कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी क्षेत्रनिहाय स्वच्छता निरीक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्र अ मध्ये स्वच्छता निरीक्षक शिवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमजद शेख, प्रल्हाद शिंदे, गजानन सुपेकर, प्रदीप गायकवाड यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने गेल्या तीन दिवसांमध्ये तिघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा  दंड कचरा जाळल्यामुळे वसूल केला आहे.

क्षेत्रिय कार्यालय ब अंतर्गत स्वच्छता निरीक्षक धोंडीबा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी कुटकर, श्रीकांत शिंदे, सुरेश कांबळे यांचे पथक तैनात झाले आहे. या पथकानेही गेल्या दोन दिवसांमध्ये तिघांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूण दीड हजारांचा दंड वसूल केला आहे.

क्षेत्रीय कार्यालय क अंतर्गत सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रवी शेंडगे, महादेव फिस्के, सिदाजी मोरे यांचे पथक कार्यान्वित झाले आहे. या पथकाने गेल्या दोन दिवसांमध्ये तिघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नlaturलातूर