केंद्र शासनाच्या विकास योजनेचा दिव्यांगांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST2021-02-17T04:24:50+5:302021-02-17T04:24:50+5:30
जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व रेणापूर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगांना सहाय्यक ...

केंद्र शासनाच्या विकास योजनेचा दिव्यांगांना लाभ
जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व रेणापूर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगांना सहाय्यक यंत्रणे व उपकरणाचे वितरण पंचायत समितीच्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, बांधकाम सभापती संगीता घुले ,पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले, रेणापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष आरती राठोड,पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे, उपसभापती अनंत चव्हाण, माजी सभापती अनिल भिसे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, बाबासाहेब घुले, ॲड. दशरथ सरवदे, अनुसाया फड ,दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, पंचायत समिती सदस्य संध्या पवार, चंचला इंगोले, बायनाबाई साळवे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद दरेकर उपस्थित हाेते.
यावेळी दिव्यांगांना कृत्रिम हात ,कृत्रिम पाय, इलेक्ट्रिकल सायकल, तीनचाकी सायकल, कानाची मशीन असे विविध यंत्र साहित्य दिव्यांगांना आ. रमेश कराड व राहुल केंद्रे यांच्या हस्ते २० लाभार्थींना देण्यात आले. रेणापूर तालुक्यातील जवळपास ३८६ पात्र लाभार्थी ठरले असून त्यांना घरपोच साहित्य पोचती केली जाणार आहे. प्रास्ताविक सभापती रमेश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी तर आभार विस्तार अधिकारी गोविंद काळे यांनी मानले.