जळकोट : तालुक्यातील बेळसांगवी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सातपैकी सहा जागांवर या पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, बेळसांगवी येथे तिरंगी लढत झाली. या लढतील धर्मपाल देवशेट्टे यांच्या पॅनेलने आपला गड कायम राखला आहे. संपूर्ण जळकोट तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले हाेते. विरोधी गटाच्या पॅनेलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या यशाबद्दल भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी जळकोट येथे धर्मपाल देवशेट्टे यांच्यासह त्यांच्या विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे कादरभाई लाटवाले, माधव मठादेवरू, बालाजी धूळशेटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले उपस्थित हाेते.
बेळसांगवीत धर्मपाल देवशेट्टे यांच्या पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST