मनसेच्यावतीने कारेपुरात ५० खाटांचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:32+5:302021-05-24T04:18:32+5:30
किनगाव-रेणापूर रस्त्यावरील कारेपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या पुढाकारातून आणि आरोग्य विभागाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या ...

मनसेच्यावतीने कारेपुरात ५० खाटांचे कोविड सेंटर
किनगाव-रेणापूर रस्त्यावरील कारेपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या पुढाकारातून आणि आरोग्य विभागाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन तहसीलदार राहुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. के. देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, कारेपूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मद्रे, डॉ. सुनील नागरगोजे यांच्या हस्ते झाले.
कोरोनाचा संसर्ग गाव, वस्ती-तांड्यापर्यंत पोहोचला आहे. तालुक्याच्या ठिकाणीच शासनाने कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. परिणामी, काही जणांना खाटा मिळत नाही. होम क्वारंटाईनसाठी घरात पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढते. संसर्गाबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी ५० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. तिथे रुग्णांना सकाळी चहा, नाष्टा, दोन वेळेस भोजन, सकाळी व सायंकाळी डॉक्टरांकडून तपासणी. तसेच रुग्णांना मोफत औषध देण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
या सेंटरच्या उभारणीसाठी भागवत शिंदे, रवी सूर्यवंशी, मनोज अभंगे, बाळासाहेब मुंडे, इम्राण मणियार, ॲड. केशव फुंदे, वाहिद शेख, ज्ञानेश्वर जगदाळे, भागवत कांदे, हृषिकेश माने, नरसिंह भताने, चेतन चौहान, प्रमोद अंबेकर, राजू काळे, बाळासाहेब भताने, शुभम डोंगरे, दौलत मुंडे, अंगद खलंग्रे, राम नागरगोजे, ओम चव्हाण, रवी गाडे, माणिक शिरसाठ, चंदू केंद्रे, वजीर शेख, गौस शेख, बिभीषण जाधव, लिंबराज जाधव आदींनी सहकार्य केले.
शासकीय पातळीवरून आवश्यक ती मदत...
कोविड सेंटरसाठी केंद्रे ॲग्रो प्रॉडक्टचे चेअरमन विजय केंद्रे यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली. डॉ. प्रमोद घुगे यांनी वैद्यकीय साहित्य व औषधी उपलब्ध करून दिली. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी २१ हजारांचे अर्थसाह्य केले. रवी गाडे व ज्ञानेश्वर जगदाळे यांनीही औषधे उपलब्ध करून दिली. तहसीलदार पाटील यांनी शासकीय पातळीवरून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे सांगितले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. के. देशमुख यांनी आरोग्य विभागाकडून सर्वातोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले.