कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:54+5:302021-05-24T04:18:54+5:30
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन येथील आरोग्यविषयक सोयी-सुविधांची पाहणी करून पंचायत समितीच्या सभागृहात रविवारी आयोजित आढावा बैठकीत ...

कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवाव्यात
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन येथील आरोग्यविषयक सोयी-सुविधांची पाहणी करून पंचायत समितीच्या सभागृहात रविवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी साकोळ, शिरूर अनंतपाळ येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अतुल जटाळे, गटविकास अधिकारी शेरखाने, डॉ. पवार, भुजबळ, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंद चिलकुरे, दगडू साळुंखे, मंगेश पाटील, संतोष शेटे, ॲड. गणेश सलगरे, गणेश धुमाळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ड्राईव्ह टू दिव्यांग उपक्रम
सध्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरू आहे. तेव्हा आरोग्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे. लसीकरण केंद्रावर सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. ड्राईव्ह टू दिव्यांग ही मोहीम राबवावी. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले.