शेतातील बांधाच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:37+5:302021-06-01T04:15:37+5:30
लातूर : काल पोलीस स्टेशनला का गेलास, असे म्हणून शेताच्या बांधाच्या कारणावरून हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारून जखमी केले. तसेच ...

शेतातील बांधाच्या कारणावरून मारहाण
लातूर : काल पोलीस स्टेशनला का गेलास, असे म्हणून शेताच्या बांधाच्या कारणावरून हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जखमी केल्याची घटना मातोळा बाजार चौक येथे ३० मे रोजी घडली. या प्रकरणी भादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सुग्रीव आत्माराम गोरे (४५, रा. मातोळा, ता. औसा) यांना पोलीस स्टेशनला का गेलास, असे म्हणून शेताच्या बांधाच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. तसेच हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारले. शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी सुग्रीव गोरे यांच्या तक्रारीवरून खंडू तानाजी गोरे (रा. मातोळा, ता. औसा) यांच्याविरुद्ध भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मंथलवाड करीत आहेत.