आम्हाला दारू पाज म्हणून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:41+5:302021-08-27T04:23:41+5:30
गैरकायद्याची मंडळी जमून मारहाण लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी येथे पाणंद रस्त्याने शेताकडून घराकडे जात असताना गैरकायद्याची मंडळी ...

आम्हाला दारू पाज म्हणून मारहाण
गैरकायद्याची मंडळी जमून मारहाण
लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पांढरवाडी येथे पाणंद रस्त्याने शेताकडून घराकडे जात असताना गैरकायद्याची मंडळी जमून फिर्यादी योगेश नागनाथ गलबले यांना मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी शिरूर आनंतपाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून रामकृष्ण खटके व अन्य ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीच्या हातावर मारून जखमी करण्यात आले असून पाठीवरही काठीने मारून मुकामार दिला आहे. पुढील तपास पो.स.इ. स्वामी करीत आहेत.
रक्तपेढीतून एसी कॉम्प्रेसरची चोरी
लातूर : गांधी मार्केट परिसरातील भालचंद्र रक्तपेढीतील एसी कॉम्प्रेसर मशीनचे तीन नग चोरीला गेल्याची घटना घडली असून याबाबत डॉ. सर्जेराव पंडितराव मोरे (रा. मित्रनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास जाधव करीत आहेत. एसी कॉम्प्रेसर मशीनच्या ३ नगांची किंमत पंचावन्न हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हाकदळ येथे बांधाच्या कारणावरून मारहाण
लातूर : अहमदपूर तालुक्यातील हाकदळ शिवारात बांधाच्या कारणावरून फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून फिर्यादीला काठीने मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत हरिभाऊ प्रकाश भोसले यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल मारुती सुरनर व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भरकाडे करीत आहेत.
रस्त्यावर चालू स्थितीत वाहन उभे केल्याने गुन्हा
लातूर : रस्त्यावर चालू स्थितीत वाहन उभे करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याच्या कारणावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भररस्त्यात एमएच २६टी ५६६९ या क्रमांकाचा ऑटो चालू स्थितीत उभा केला. यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या कारणाने पोलीस कॉन्स्टेबल युसूफअली मुर्तुजाली धावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.