विकलेली जमीन परत मिळवून दे म्हणून मध्यस्थास मारहाण
By आशपाक पठाण | Updated: August 30, 2023 18:41 IST2023-08-30T18:41:10+5:302023-08-30T18:41:29+5:30
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकलेली जमीन परत मिळवून दे म्हणून मध्यस्थास मारहाण
लातूर : दहा वर्षांपूर्वी विकलेली जमीन मला परत द्यायला सांगा, म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संभाजी रामकिशन रेड्डी (रा. ममदापूर, ता. लातूर) यांना गोपाळ गोविंद लकडे (रा. लातूर) याने गावाकडील दहा वर्षांपूर्वी माने यांनी खरेदी केलेली जमीन मला परत द्यायला सांगा, तुम्ही व्यवहारात मध्यस्थी होता.
माने हे तुमचे मित्र आहेत, असे म्हणून धक्काबुक्की करून, शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून गोपाळ लकडे याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. चौगुले हे करीत आहेत.