भांडणाचा राग मनात धरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:17+5:302021-07-02T04:14:17+5:30

कारच्या काचा फोडून पाच हजारांचे नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा लातूर : लातूर शहरातील उस्मानपुरा कॉर्नर येथे एमएच १२ एनएक्स २६०५ ...

Beating with anger in mind | भांडणाचा राग मनात धरून मारहाण

भांडणाचा राग मनात धरून मारहाण

कारच्या काचा फोडून पाच हजारांचे नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा

लातूर : लातूर शहरातील उस्मानपुरा कॉर्नर येथे एमएच १२ एनएक्स २६०५ या क्रमांकाच्या कारच्या काचा फोडून ५ हजारांचे नुकसान केले. तसेच फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादी मुजिद महेबुबसाब काझी (रा. दस्तगीर गल्ली, अहमपदूर, ता. अहमदपूर) हे आपल्या कारमध्ये पत्नीसोबत बसून जात असताना आरोपीने कारजवळ येऊन ड्रायव्हर साईडच्या समोरील दाराच्या काचेवर बुक्क्या मारून फोडले. पाच हजारांचे नुकसान केले. याबाबत फिर्यादी मुजिद यांनी जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपाळावर चावा घेऊन जखमी केले. फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यास आले असता तिलापण मारहाण केली, असे मुजिद काझी यांनी शिवाजीनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मुजिब सईदमियाँ सय्यद (रा. उस्मानपुरा, लातूर) याच्याविरुद्ध कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. भताने करीत आहेत.

औसा तहसीलमधून दुचाकी चोरीला

लातूर : औसा येथील तहसील कार्यालय परिसरात पार्किंग केलेल्या एमएच २४ एएन ४६९१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत संतोष अशोकराव येरोळकर (रा. साईरोड, आर्वी लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोर्टातील केस मागे घे म्हणून घरात घुसून मारहाण

लातूर : शेतीबाबत कोर्टात तू केलेली केस मागे घे म्हणून घरात घुसून मारहाण केल्याची घटना निलंगा तालुक्यातील केळगाव येथे घडली. याबाबत आठ जणांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गैरकायद्याची मंडळी जमवून केळगाव येथे फिर्यादी जोतिराम हणमंतराव पाटील यांच्या घरात घुसून तू शेताबाबत केलेली केस मागे घे, नाही तर तुझे काही खरे नाही, असे म्हणून घरातील लोकांना शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घरातील सर्वांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, असे जोतिराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार लहू प्रभू कांबळे व अन्य सात जणांविरुद्ध (सर्व रा. जाजनूर, ता. निलंगा) निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सूर्यवंशी करीत आहेत.

अहमदपूर शहरातून दुचाकीची चोरी

लातूर : अहमदपूर शहरातील कराड नगर येथून एमएच २४ पी ३६१९ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत शकिल मकदुम कुरेशी (रा. कराड नगर, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक

लातूर : उदगीर-देगलूर रोडवर रंगवाळ तांड्यालगत भरधाव वेगात, निष्काळजीपणे वाहन चालवून फिर्यादी कल्याणराव व्यंकटराव पाटील यांच्या एमएच २४ एल ११४३ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एमएच २४ बीजे ८३९४ क्रमांकाच्या दुचाकी चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी जखमी झाले. याबाबत एमएच २४ बीजे ८३९४ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुकानात घुसून मारहाण

लातूर : ट्रक अपघाताचे प्रकरण मिटवून घेण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या दुकानात घुसून, दुकानाच्या काचा फोडून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना उदगीर येथे घडली. याबाबत रमेश विश्वनाथ बिराजदार (रा. माळेवाडी, ता. उदगीर, ह.मु. आडत उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल कलाप्पा खेणे व अन्य एकाविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारची दुचाकीला धडक; एकजण जखमी

लातूर : भरधाव वेगातील कारने लातूर-नांदेड रोडवरील घरणी पेट्रोल पंपाजवळ एमएच २४ एए २६४८ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाले. मनगटाला, कपाळावर गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत भगवान कणिक धाकपाडे (रा. जानवळ, ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ एएस ६८७४ या क्रमांकाच्या कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Beating with anger in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.