सामायिक विहिरीतील पाणी घेण्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:53+5:302021-02-16T04:20:53+5:30
बाजूला थांबा असे म्हटल्याने जबर मारहाण लातूर : मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना गावातील काही मुलांना बाजूला थांबा, असे म्हटल्याच्या ...

सामायिक विहिरीतील पाणी घेण्याच्या कारणावरून मारहाण
बाजूला थांबा असे म्हटल्याने जबर मारहाण
लातूर : मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना गावातील काही मुलांना बाजूला थांबा, असे म्हटल्याच्या कारणावरून हा रस्ता काही तुझ्या बापाचा आहे का म्हणून फिर्यादी नरेश मधुकर कांदे (रा. दिवेगाव, ता. रेणापूर) यांना जबर मारहाण झाली. याबाबत १० जणांविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नरेश मधुकर कांदे मोटारसायकलवर गावाकडे जात असताना गावातील काही मुले थांबले होते. त्यांना बाजूला थांबा, असे म्हणताच यातील काहींनी त्यांना हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का? असे म्हणून बेल्टने उजव्या हातावर मारहाण केली. तसेच काठीने कमरेवर मारले. उजव्या पायावर, पिंढरीवर मारून मुका मार दिला. लोखंडी रॉडने जबर मारहाण केली, असे किनगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चंद्रकांत रामराव कांदे व अन्य नऊ जणांविरुद्ध (सर्व रा. दिवेगाव, ता. रेणापूर) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. पलमटे करीत आहेत.
आर्वी, प्रकाश नगरातून दुचाकीची चोरी
लातूर : आर्वी शिवारात पार्किंग केलेल्या एमएच २४ बीई ८१३७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना १४ रोजी घडली. याबाबत गंगाधर विठ्ठल शिवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रकाशनगर येथे पार्किंग केलेल्या एमएच २४ एव्ही १३५० या क्रमांकाच्या स्कूटीची चोरी झाल्याची घटना १४ रोजी घडली. याबाबत रतनलाल हरिप्रसाद तोष्णीवाल (रा. पानगाव, ता. रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पो.ना. घुले करीत आहेत.
शेत नांगरण्यावरून धक्काबुक्की; गोठाही जाळला
लातूर : शेत नांगरण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाल्याची घटना भेटा शिवारात घडली. या प्रकरणात फिर्यादीचा गोठाही जाळला. याबाबत श्रीमंत दत्ता वानवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसंत मुरलीधर वानवडे व अन्य दोघांविरुद्ध भादं पोलीस ठाण्यात कलम ४३५, ४२३, ५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.