जमीन नावावर करण्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:39+5:302021-08-25T04:25:39+5:30
मध्यवर्ती बसस्थानकातून दुचाकीची चोरी लातूर : लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंग केलेल्या एमएच १३ बीटी ७३३६ या क्रमांकाच्या दुचाकीची ...

जमीन नावावर करण्याच्या कारणावरून मारहाण
मध्यवर्ती बसस्थानकातून दुचाकीची चोरी
लातूर : लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंग केलेल्या एमएच १३ बीटी ७३३६ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत शिवप्रसाद दत्तात्रय भालेराव (रा. मोगरगा, ता. औसा, ह.मु. कव्हा नाका, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर येथून ॲक्टिव्हा चोरीला
लातूर : पेट्रोल संपल्याने उदगीर शहराच्या पूर्वेस अर्धा किलोमीटर अंतरावर पार्किंग केलेल्या ॲक्टिव्हा पासिंग नंबर पीबी ०५ एजी ८१६२ या क्रमांकाची चोरी झाली. याबाबत दिलीप स्वरूप सूर्यवंशी (रा. होळसमुद्र, ता. कमालनगर, जि. बिदर, हमु. निडेबन, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घरासमोरून ऑटोची चोरी; गुन्हा दाखल
लातूर : घरासमोर पार्किंग केलेल्या ऑटोची चोरी झाल्याची घटना उदगीर येथे घडली. रात्री पार्किंग करून घरी झोपल्यानंतर सकाळी उठून पाहिले असता ऑटो दिसला नाही. अज्ञात चोरट्यांनी तो चोरला. याबाबत सुनील हणमंतराव यलवाड (रा. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ऊसतोडीचे पैसे मागितल्यावरून जबर मारहाण
लातूर : ऊसतोडीचे ७४ हजार रुपये मागितल्याच्या कारणावरून फिर्यादीला जबर मारहाण झाल्याची घटना नांदुर्गा तांडा येथे घडली. याबाबत किल्लारी पोलिसात भीमा हरिश्चंद्र पवार (रा. नांदुर्गा तांडा, ता. औसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पैसे का मागतोस म्हणून घरासमोर येऊन शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले तसेच फिर्यादीच्या आईलापण काठीने मारून मुका मार दिला. परत पैसे मागण्यास आलास तर जिवे मारतो, अशी धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार प्रकाश ऊर्फ पिंटू दासू पवार व अन्य तिघांविरुद्ध किल्लारी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आमच्या घरी का गेला होतास म्हणून मारहाण
लातूर : तू आमच्या घरी का गेला होतास म्हणून चाकूने मारून जखमी केल्याची घटना शिवणखेड येथे घडली. याबाबत गोविंदसिंग गोपाळसिंग ठाकूर (रा. शिवणखेड, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी रतनसिंग ठाकूर व अन्य दोघांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सन्मुखराव करीत आहेत.
जनावरे हाकलून लावण्यावरून मारहाण
लातूर : तू माझी जनावरे का हाकलून लावलीस म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्याला गचांडी देऊन काठीने मारहाण केली. डोक्यात मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथे घडली. याबाबत नागेश मनोहर ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूर्यकांत मनोहर ढाकणे याच्याविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गोखरे करीत आहेत.
सिद्धेश्वर नगर येथून दुचाकीची चोरी
लातूर : सिद्धेश्वर नगर येथे पार्किंग केलेल्या एमएच २४ बीक्यू ७९३७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत राजकुमार दादाराव सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.