भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST2020-12-12T04:35:54+5:302020-12-12T04:35:54+5:30

कारची ऑटोस धडक; दोघे जण जखमी लातूर : पिंपळफाटा-रेणापूर येथे भरधाव वेगातील कारने ऑटोस जोराची धडक दिली. यामध्ये ऑटोमधील ...

Beaten one by removing the evils of quarrel | भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण

भांडणाची कुरापत काढून एकास मारहाण

कारची ऑटोस धडक; दोघे जण जखमी

लातूर : पिंपळफाटा-रेणापूर येथे भरधाव वेगातील कारने ऑटोस जोराची धडक दिली. यामध्ये ऑटोमधील दोन कामगार जखमी झाले असून, ऑटोचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी विशाल देविदास टेकाळे यांच्या तक्रारीवरून कार क्र. एमएच २४ व्ही ८९८५ च्या चालकाविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ. गुळभेले करीत आहेत.

विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने लोकअदालत

लातूर : महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने चाकूर येथील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत, महावितरण यासह विविध प्राधिकरणाची नागरिकांकडे देय असलेली थकबाकी तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहे. कोरोना उपाययोजनांचे पालन करीत लोकअदालत पार पडणार असल्याचे विधि सेवा प्राधिकरण समितीने सांगितले.

बॅरिकेड्‌स बसविले

लातूर : एमआयडीसी परिसरातील ५ नंबर चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी बॅरिकेड्‌स बसविण्यात आले आहेत. या चौकात सायंकाळच्या वेळी अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत होता. बॅरिकेड्‌स बसल्यामुळे वाहतुकीस सोय झाली आहे.

रिंग रोड परिसरात कचरा

लातूर : एमआयडीसी परिसरातील खाडगाव रिंग रोड परिसरात मोकळ्या प्लाॅटवर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपाची घंटागाडी नियमित येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे शहर मनपाने कचरा संकलनासाठी नियमित घंटागाडी पाठविण्याची मागणी आहे.

येणकी-माणकी रोड येथून दुचाकीची चोरी

लातूर : उदगीर तालुक्यातील येणकी-माणकी येथे जनावरांच्या बाजार परिसरात पार्किंग केलेली एमएच २४ एझेड ३०५३ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी भरत मोहनराव सूर्यवंशी यांनी येणकी-माणकी रोड येथे आपली दुचाकी पार्किंग केली होती. बैल विक्रीसाठी बाजारामध्ये ते गेले व दुपारी दुचाकी नेण्यासाठी ते आले असता दुचाकी नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात सत्कार

लातूर : येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण पुरी, खंडू बनसोडे, लक्ष्मीकांत शिरूरे, रंगनाथ चरकपल्ले, दीप्ति कागणे, संतोष चव्हाण, प्रियंका ठोंबरे यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तेजस पाटील, कृष्णा वगरे, प्रथमेश जाधव, संस्कार इंदाणी, अथर्व हिरवे, रणवीर वगरे, आशुतोष माने यांचा समावेश आहे. विद्यालयाचे एकूण ४८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गुणवंतांचे शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, मुख्याध्यापिका सुश्री चेतना शहा, उपमुख्याध्यापक सुरेश बंग आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

जयश्री ठवळे यांची मुख्याध्यापकपदी निवड

लातूर : येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री देशीकेंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी जयश्री ठवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला असून, विद्यालयाच्या गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व संचालकांनी कौतुक केले आहे.

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लातूर : जिल्ह्यात ३ लाख २० हजारांहून अधिक हेक्टर्सवर रबी हंगामाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक २ लाख २७ हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. यंदा समाधानकारक पाऊस होता. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. रबी हंगामातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पिके बहरू लागली आहेत. कृषी विभागाच्या वतीने हरभरा पीक व्यवस्थापन संदर्भात फवारणी आणि खताबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी गावस्तरावर कृषी सहायक शेतकऱ्यांना फवारणीची माहिती देत आहेत.

कृषी व्यवस्थापन पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू

लातूर : कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या पदवी अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा देण्यात आला आहे. या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जी.टी. थोंटे यांनी केले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीशी संलग्नित असलेल्या कृषी व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Beaten one by removing the evils of quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.