जागा वाटून देण्याच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:03+5:302021-05-23T04:19:03+5:30
जागेतून वाट नसल्याने मारहाण लातूर : कासारशिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडूर येेथे फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर वाट का देत नाहीस ...

जागा वाटून देण्याच्या कारणावरून मारहाण
जागेतून वाट नसल्याने मारहाण
लातूर : कासारशिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडूर येेथे फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर वाट का देत नाहीस म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत लक्ष्मण तमन्ना सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर तमन्ना सूर्यवंशी व अन्य तिघांविरूद्ध कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पो.ना. सिरसाठ करीत आहेत.
----------------------------------
ट्रकची ॲम्ब्युलन्सला धडक
लातूर : किल्लारी परिसरातील जाऊ पाटीजवळ भरधाव वेगातील एमएच १२ एचडी २५५७ या क्रमांकाच्या ट्रकचालकाने भरधाव वेगात राँग साईडने येऊन १०८ ॲम्ब्युलन्स क्रमांक एमएच १४ सी डब्ल्यू २५८४ ला जोराची धडक दिली. डाव्या साईडचे ग्लास या धडकेत फुटले असून, ट्रकचालक न थांबता निघून गेला. याबाबत गणेश शेषेराव माने रा. अपचुंदा ता. औसा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच १२ एचडी २५५७ या क्रमांकाच्या ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिंदे करीत आहेत.
-----------------------
पैसे देवाणघेवाणीवरून मारहाण
लातूर : पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून कमालपूर येथे लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली. फिर्यादीला शिवीगाळ करून काठीने मारून फ्रॅक्चर केले. तसेच फिर्यादीच्या आई व भावाशी लाथाबुक्क्याने, काठीने मुक्कामार दिला. याबाबत वैभव वसंत पुरी रा. कमालपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणिक किसन गिरी व अन्य दोघे रा. रामनगर ता. आठपाडी जि. सांगली यांच्याविरूद्ध भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
------------------------------------
धु-याचा निठोबा काढण्यावरून मारहाण
लातूर : भडी शिवारात धु-याचा निठोबा काढण्यावरून फिर्यादीच्या मुलास मारहाण करण्यात आली. तसेच मारहाण का करता असे विचारले असता फिर्यादीलाही डोक्यात मारून जखमी केले. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सुभाष गणपती कोल्हे रा. भडी ता. लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष मनोहर नरहरे व अन्य दोघांविरूद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-------------------------------
किल्लारी येथून दुचाकीची चोरी
लातूर : किल्लारी येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ बीए २१५१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २० मे रोजी घडली. याबाबत धनराज जुगलकिशोर बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, लातूर शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
--------------------------
शेताच्या वाटणीवरून नागदरवाडी येथे मारहाण
लातूर : नागदरवाडी येथील शिवारात शेतीची वाटणी झाल्याशिवाय, नांगरायचे नाही असे म्हणून नांगरणी बंद करून फिर्यादी प्रभू तुळशीराम आयनुले यांना मारहाण झाली. कु-हाडीच्या दांड्याने डोक्यात मारून जखमी केले. तसेच त्यांच्या मुलाच्या पायावर मारून जखमी केले. याबाबत प्रभू आयनुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभंग तुळशीराम आयनुले व अन्य दोघांविरूद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.