तू आमच्या दारातून जायचे नाहीस म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:32+5:302021-09-10T04:26:32+5:30

बसमध्ये चढत असताना मोबाइल पळविला लातूर : क्रीडा संकुलासमोरील बसस्टॉपवरून बसमध्ये चढत असताना खिशात ठेवलेला मेाबाइल लंपास केल्याची घटना ...

Beat you because you don't want to go through our door | तू आमच्या दारातून जायचे नाहीस म्हणून मारहाण

तू आमच्या दारातून जायचे नाहीस म्हणून मारहाण

बसमध्ये चढत असताना मोबाइल पळविला

लातूर : क्रीडा संकुलासमोरील बसस्टॉपवरून बसमध्ये चढत असताना खिशात ठेवलेला मेाबाइल लंपास केल्याची घटना घडली. याबाबत राम ज्ञानोबा बेंबडे, रा. विशालनगर, लातूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चौगुले करीत आहेत. दरम्यान, बसस्थानक, बसस्टॉपवरून एसटीमध्ये चढत असताना खिसे मारीचे प्रमाण वाढत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दुचाकीच्या अपघातात एक जण जखमी

लातूर : मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव शिवारातील रस्त्यावर भरधाव वेगातील एका दुचाकीने फिर्यादीच्या एमएच २४ वाय ५०८७ क्रमांकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. याबाबत प्रफुल्लकुमार मधुकर काळे यांच्या तक्रारीवरून महेश धनंजय गरड, रा. शिराळा, ता. लातूर यांच्याविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुंडे करीत आहेत.

Web Title: Beat you because you don't want to go through our door