उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:26+5:302021-02-07T04:18:26+5:30
येथील महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याच्या निमित्ताने उत्तम स्वास्थ्यासाठी आयुर्वेद या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ...

उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वापर करावा
येथील महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याच्या निमित्ताने उत्तम स्वास्थ्यासाठी आयुर्वेद या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रशांत डोंगळीकर, डॉ. प्रशांत बिरादार यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले, आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून, कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाचे महत्त्व समजले. सर्वांनी प्राणायाम, योगा व आयुर्वेदाचा जीवनात अंगीकार करावा, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या आजारांवर घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधांविषयीही माहिती दिली.
यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार म्हणाले, आयुर्वेद म्हणजे माणसाला निसर्गाशी एकरूप होण्याचा मूलमंत्र देणारी महान ज्ञानशाखा असून, आयुर्वेदिक तत्त्वप्रणालीचे आयुष्यात उपयोजन करुन प्रत्येकाने सुंदर सहजीवनाचा आनंद घेतला पाहिजे. आयुर्वेदात सांगितलेला आहार, विहार आणि विचारपद्धतीचा अंगीकार करावा, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन संयोजक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी आभार मानले.