उदगीरातील दोन बालसाहित्यिकांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:01+5:302021-07-28T04:21:01+5:30

या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक कोळी, पांडुरंग पुठ्ठेवाड व संयोजक वीरभद्र मिरेवाड यांच्या संयोजन ...

Award to two children's writers from Udgira | उदगीरातील दोन बालसाहित्यिकांना पुरस्कार

उदगीरातील दोन बालसाहित्यिकांना पुरस्कार

या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक कोळी, पांडुरंग पुठ्ठेवाड व संयोजक वीरभद्र मिरेवाड यांच्या संयोजन समितीने २०२० वर्षातील कथा, कविता व कादंबरी या गटांतील पुरस्कारांची घोषणा रविवारी केली. यात संजय ऐलवाडलिखित ‘बिबट्याचे पिल्लू’ हा बालकथासंग्रह व रसूल दा. पठाण यांच्या ‘निसर्गाशी जुळवू नाते’ या बालकवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येक गटासाठी दोन हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील-चव्हाण, साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी दिली. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य प्रमोद चौधरी, प्रा. एम. व्ही. स्वामी, सिद्धार्थ बोडके, विश्वनाथ मुडपे, मोतीलाल डोईजोडे, प्रा. रामदास केदार, दयानंद बिरादार, अनिता यलमटे, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, विलास सिंदगीकर, लक्ष्मण बेंबडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, ज्योतीताई डोळे, नीता मोरे, रवींद्र हसरगुंडे, आदींनी कौतुक केले आहे.

Web Title: Award to two children's writers from Udgira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.