शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

शेती संस्कृतीचा सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 6:38 PM

जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे.

लातूर : जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली.

लातूर येथे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत असलेले कवी देशमुख यांनी गद्य व पद्य स्वरुपात विपुल लेखन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, कष्टकरी, दलित यांचे दु:ख व वेदना ही माझ्या लेखनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रहाचे नाव संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ओवीचे आहे. तुकोबा, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारपरंपरा आम्ही मानतो.

शेती व्यवस्थेतील दु:ख व वेदना यांचा शोध घेणे ही जबाबदारी वाटते. त्यामुळे लेखनात कष्टकºयांचे आयुष्य आणि वेदना उमटली आहे. हा भूमीनिष्ठ बनलेल्या ‘बोलावें ते आम्ही’ काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनने वाचकांसमोर आणला आहे, असेही देशमुख म्हणाले.मूळचे सिंदखेडराजा जवळील राहिरी येथील रहिवासी असलेले श्रीकांत देशमुख यांचे औरंगाबाद व जालना येथे शिक्षण झाले. काही काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी शासकीय सेवा स्वीकारली. ते नांदेड येथे साखर सहसंचालक होते व सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक आहेत.बळिवंत / श्रीकांत देशमुख...श्रीकांत देशमुख यांचे ‘बळिवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रह शेतीनिष्ठ जीवनावर आधारित आहे. देशमुख हे कविता हा वाङ्मय प्रकार गंभीरपणे हाताळणारे व स्वत:ची जीवनदृष्टी असणारे कवी आहेत. कृषी जनसमुहाच्या वास्तवाची मांडणी करणाºया या कविता शेतक-यांच्या जगण्यात बारमाही येणाºया चढ-उताराला केंद्रभागी ठेवतात. त्यामुळे ही कविता म्हणजे शेतकºयांची सलग आत्मचरित्र गाथा बनते. गावगाडा, गावगाड्याची जीवन पद्धती आपल्या कवितेत त्यांनी अस्सलपणे शब्दबद्ध केली आहे. शेतकºयांची अगतिक स्थिती, कुचंबना, वाट्याला येणारे दु:ख, दु:खावेगातून घडलेल्या आत्महत्या कवितेत अपरिहार्यपणे चित्रित होतात. त्यांच्या कवितेतील कृषी समुहातील स्त्री जगण्याचे केलेले चित्रण स्वतंत्रपणे विचारात घेतले पाहिजे, इतके ते वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहे. देशमुखांची कविता ही कृषी जनसमुहाचाच उद्गार आहे. त्यांच्या कवितेत येणारी प्रतिमा, प्रतिके ही खास कृषी जनव्यवस्थेतील आहेत. जगण्याचा तळ हा तणावासह शोधणे तिला महत्त्वाचे वाटते. कृषीमूल्य व्यवस्था, दु:ख, दारिद्र्य, तुटलेपणा ही त्यांच्या कवितेची आशयसूत्रे बनतात. शेतक- यांचे संपूर्ण जगणेच एक दीर्घ अभंग बनते. त्यामुळे आपली जातकुळी, पूर्व परंपरा तुकारामांची आहे याची भरीव आठवण त्यांची कविता देते. - राजन गवस