केंद्रे महाविद्यालयाची साहाय्यता निधीस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:35+5:302021-07-11T04:15:35+5:30
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने म्हणाले, कोविडच्या जागतिक संकटामुळे राज्य शासनाकडून आपत्ती निवारणार्थच्या उपायोजनांसाठी आणि गरजूंना मदतीसाठी आवाहन ...

केंद्रे महाविद्यालयाची साहाय्यता निधीस मदत
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने म्हणाले, कोविडच्या जागतिक संकटामुळे राज्य शासनाकडून आपत्ती निवारणार्थच्या उपायोजनांसाठी आणि गरजूंना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते, त्यास प्रतिसाद देण्यात आला आहे. यापूर्वीही एक आणि दोन दिवसांचे वेतन येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाने देऊन आर्थिक मदत देत सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस अर्थसाहाय्य देण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत २ लाख २४ हजार ५५३ रुपयांची मदत देण्यात आली आहे.
राज्य, देशात जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा महाविद्यालयाकडून मदत दिली जाते. आतापर्यंत उत्तराखंडमधील भूंकप, दुष्काळ मदत, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत, गरीब दिव्यांग मुलांच्या सायकली दुरुस्ती, आत्महत्याग्रस्त मुलांना महाविद्यालयाकडून मदत केली जाते. हा निधी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जळकोट शाखेतून मुख्यमंत्री साहाय्यता निधीस जमा करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने व कर्मचाऱ्यांचे कौतुक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मानवेंद्र केंद्रे, संस्थाध्यक्ष डॉ. भागवत केंद्रे, आदींनी केले आहे.