कुरापत काढून केली मारहाण, दाेन गटांतील पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:26+5:302021-08-26T04:22:26+5:30

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ बनसाेडे (वय ४८ रा. भातांगळी, ता. लातूर) यांना गावातीलच दिनकर रायप्पा सूर्यवंशी यांच्यासह अन्य ...

Assault on five members of the Daen group | कुरापत काढून केली मारहाण, दाेन गटांतील पाच जणांवर गुन्हा

कुरापत काढून केली मारहाण, दाेन गटांतील पाच जणांवर गुन्हा

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ बनसाेडे (वय ४८ रा. भातांगळी, ता. लातूर) यांना गावातीलच दिनकर रायप्पा सूर्यवंशी यांच्यासह अन्य दाेघांनी संगनमत करून मागील भांडणाची कुरापत काढून तू येथे का थांबलास, तू खूप माजला आहेस म्हणून शिवीगाळ करत काठीने हातावर मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी दिनकर रायप्पा सूर्यवंशी (वय ५५, रा. भातांगळी, ता. लातूर) यांना गावातीलच कमलाकर बनसाेडे यांच्यासह अन्य दाेघांनी संगनमत करून मागील भांडणाची कुरापत काढून माेटारसायकलला कट का मारलास म्हणून शिवीगाळ करत लाकडाने डाेक्यात, मनगटावर मारहाण करून जखमी केले. विटाने पाठ, पायावर आणि इतर ठिकाणी मुका मार दिला. त्याचबराेबर जीवे मारण्याची धमकीही दिली.

याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दिलेल्या परस्परविराेधी तक्रारींवरून दाेन गटांतील पाच जणांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपाेसइ पांढरे करीत आहेत.

Web Title: Assault on five members of the Daen group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.