आष्टामाेड - उदगीर महामार्गाची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:16+5:302020-12-31T04:20:16+5:30
लातूर जिल्ह्यातील आष्टामोड ते नळेगाव आणि येरोळमोड ते तिवटघ्याळपाटी दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळणी ...

आष्टामाेड - उदगीर महामार्गाची झाली चाळण
लातूर जिल्ह्यातील आष्टामोड ते नळेगाव आणि येरोळमोड ते तिवटघ्याळपाटी दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळणी झाल्याने खड्डे चुकविताना दुचाकी, चारचाकी वहानधारकाना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहानाला खड्यांचा अंदाज लागत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यातून छोट्या वाहानांचा खुळखुळा होत आहे. यरोळमोडपासून उदगीरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, बुजविलेले खड्डे एक महिन्याच्या आतच उखडले आहेत. अजनसोंडापाटी ते येरोळमोडपर्यंतचा रस्ता चांगला झाला आहे. अजनसोंडापाटी ते येरोळमोड हा मार्ग दोन वर्षापूर्वी झाला आहे. साईटपट्या न भरल्याने मोठ्या वाहानचालकांना साईड देण्यासाठी चालकांना त्रास हाेत आहे. येरोळमोड ते तिवटघ्याळपाटी पर्यंतच्या रस्त्यात्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहान चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर रात्रं-दिन वाहानांची माेठी वर्दळ असते. सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असून, ते कासवगतीने सुरु आहे. अरुंद रस्त्यावरुन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.
येरोळमोड ते उदगीरपर्यंतचा मार्ग २४ किलोमीटर आहे. या मार्गावरील प्रवासासाठी दिड तासचा कालावधी लागत आहे.