लातूरच्या बाजारात साेयाबीनची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:18+5:302020-12-13T04:34:18+5:30
लातूर आणि उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत दाेन आठड्यात विक्रमी भाव मिळाला. परिणामी, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल ...

लातूरच्या बाजारात साेयाबीनची आवक घटली
लातूर आणि उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत दाेन आठड्यात विक्रमी भाव मिळाला. परिणामी, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी माेठ्या प्रमाणावर आणला हाेता. आता टप्प्या-टप्प्याने साेयाबीनची आवक घटली असून, आता साेयाबीनला प्रितक्विंटलला मिळणारा भावही उतरला आहे. शनिवारी १४ हजार ३४६ क्किंटलची आवक झाली आहे. याशिवाय, इतर शेतमालाचीही आवक झाली आहे. यामध्ये गुळाची ९८० क्विंटलची आवक झाली. गव्हू ९९९ क्विंटल, ज्वारी- हायब्रीड - १११ क्विंटल, ज्वारी-रबी ११८ क्विंटल, ज्वारी-पिवळी केवळ ३० क्विंटलची आवक झाली आहे. हरभरा ४९७ क्विंटलची आवक झाली आहे. मुगाची आवक ३८४ क्विंटल, उडीद - १ हजार ७४ क्विंटल आणि करडइची ३४ क्विंटल आवक झाली आहे. मात्र, या आठवड्यात टप्प्या-टप्प्याने साेयाबीनची आवक घटली आहे.
उडीदाला ७ हजार १०० रुपयांचा भाव...
लातूरच्या आडत बाजारात उडीदाला प्रतिक्विंटल कमाल भाव ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. किमान भाव ४ हजार ६०१ तर सर्वसाधारण भाव ७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. त्यापाठाेपाठ मुगाला प्रतिक्विंटलला कमाल भाव ७ हजार २८० रुपयांचा भाव मिळाला. किमान भाव ३ हजार ८०१ तर सर्वसाधारण भाव ५ हजार १०० रुपयांचा मिळाला आहे. गुळाला प्रतिक्विंटलला कमाल भाव २ हजार ७०० रुपयांचा मिळाला. किमान भाव २ हजार ६१० आणि सर्वसाधारण भाव २ हजार ६५० रुपयांचा दर मिळाला आहे. हरभराला प्रतिक्विंटलला कमाल भाव ४ हजार ४७१ रुपयांचा भाव मिळाला. किमान भाव ३ हजार ५०० आणि सर्वसाधारण भाव ४ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे.