शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

लातूर रोडला सशस्त्र दरोडा; शस्त्राचा धाक दाखवून तीन-चार घरे लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 20:08 IST

चाकूचा धाक दाखवून तीन घरे लुटली; चाकुर तालुक्यात भितीचे वातावरण

ठळक मुद्देलिंबुटे यांना चाकूचा धाक दाखवून बस्वराज सगरे यांचे घराचे दार काढण्यास भाग पाडले. तेथून सोने,चांदीचे दागिने रोख ४९ हजार रुपये लुटले. लक्षण धाकपाडे यांच्या छतावरुन घरात प्रवेश केला.

चाकूर (जि.लातूर) : चाकूर तालुक्यातील लातूररोड येथे सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून तीन घरे लुटली आहेत. यावेळी  सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण  ५ लाख २१ हजाराचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी अन्य दोन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक जागे झाल्याने तेथून ते पसार झाले.

लातूर रोड येथील बाबूराव कलाल यांच्या घरी रात्री १.०५ मिनिटाला दरोडेखोरांनी मुख्य प्रवेशद्वार टामीच्या सह्याने तोडले. कलाल यांना चाहूल लागली. दरोडेखोर तेथून पसार झाले. तेथून लक्ष्मीकांत राठी यांच्या घरासमोर दबा देऊन बसले. घराचे मागचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. राठी यांच्या पत्नी जागी झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारचे मधूकरराव मुंडे घराबाहेर आले. दरोडेखोरांनी दगडफेक केली. राजेश्वर पाटील यांच्या घरातील सोन्याची दागिने, रोख २६ हजार रुपये घेतले. दरोडेखोरांनी पाटील यांच्या बेडरुममध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखविला. चार वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून एक दरोडेखोर तेथेच थांबला. पाटील, त्यांची पत्नी, एका लहान मुलीस चाकूचा दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावर नेले. तेथे राजकुमार लिंबुटे यांना हाक मारुन घराचे दार काढण्यास भाग पाडले. पाटील यांच्या मागे शस्त्रधारी लोक पाहताच लिंबूटे यांनी दार बंद करण्याचा प्रयत्न केला तो असफल ठरला. लिंबूटे त्यांची पत्नी सर्वांना धाक दाखवून एका जागेवर गप्प बसण्यास भाग पाडले. त्यांना चाकूचा धाक दाखवून सोने,चांदीचे दागिणे व ९६ हजार रुपये रोख असा एवज लंपास केला.

लिंबुटे यांना चाकूचा धाक दाखवून बस्वराज सगरे यांचे घराचे दार काढण्यास भाग पाडले. तेथून सोने,चांदीचे दागिने रोख ४९ हजार रुपये लुटले. लक्षण धाकपाडे यांच्या छतावरुन घरात प्रवेश केला. टामीच्या सह्याने दार तोडले. हॉलमध्ये लक्ष्मण यांचे वडील नारायण यांना काठीने मारहाण केली. दरोडेखोर आल्याची चाहूल लागल्याने लक्ष्मण यांनी पोलिस ठाण्यात फोन केला. तेव्हा त्यांची पत्नी सोन्याचे दागिने लपवून ठेवत होती. खिडकीतून एक दरोडेखोर हा प्रकार पाहत होता. अखेर लक्ष्मण यांच्या खोलीचे दार तोडून दरोडेखोरांनी दागिने व रोख रक्कम १ लाख ४८ हजार असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी