शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

संतापजनक ! अंत्यविधीसाठी जागा न मिळाल्याने तीन मृतदेह २६ तास शवागारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 7:34 PM

नागरिकांनी अंत्यविधी करण्यास विरोध करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले.

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचे महापालिकेसमोर आंदोलन 

लातूर : कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने तीन मृतदेह २६ तास शवागारात ठेवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी स्मशानभूमीत जागा उपलब्ध झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कोरोनामुळेमंगळवारी शहरातील तिघांचा मृत्यू झाला होता. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. मात्र, पाऊस झाल्याने स्मशानभूमीत जेसीबी फसली. त्यामुळे तेथे अंत्यविधी न करता तेथून दुसऱ्या स्मशानभूमीत सदर मृतदेह नेण्यात आले. मात्र, तेथील नागरिकांनी अंत्यविधी करण्यास विरोध करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. त्यामुळे मंगळवारपासून बुधवारी दुपारपर्यंत तिन्ही मृतदेह शवागारात ठेवले गेले. दरम्यानच्या काळात मृतांच्या नातेवाईकांनी प्रयत्न केले; परंतु अंत्यविधीला जागा उपलब्ध होऊ शकली नव्हती. अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सिद्धेश्वर येथील स्मशानभूमीत जागा उपलब्ध झाल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. 

संतप्त नागरिकांचे महापालिकेसमोर आंदोलन कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी बुधवारी महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन केले. महापौर व आयुक्तांना निवेदन देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे व महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. आंदोलनात ओमप्रकाश झुरुळे, बालाजी पिंपळे, शरणाप्पा अंबुलगे, नितीन मोहनाळे, बाळासाहेब महाजन, कमलाकर डोके-पाटील, सुनील ताडमाडगे, विपीन हालिंगे, नीलेश कुरडे, किशोर रोडगे आदींचा समावेश होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूरDeathमृत्यू