रागा पुढे तुटले नाते; मोटारसायकलची चावी न दिल्याने मोठ्या भावाचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:51 IST2021-01-07T14:49:30+5:302021-01-07T14:51:11+5:30

crime news : संतापाच्या भरात भावाने लाकडाने केली मारहाण

Anger further breaks the relationship; Murder of elder brother for not giving motorcycle keys | रागा पुढे तुटले नाते; मोटारसायकलची चावी न दिल्याने मोठ्या भावाचा केला खून

रागा पुढे तुटले नाते; मोटारसायकलची चावी न दिल्याने मोठ्या भावाचा केला खून

ठळक मुद्देआरोपी भावास पोलिसांनी केली अटक

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील माळेगाव (खु.) येथे माेठ्या भावाला माेटारसायकलची चावी मागितली असता न दिल्याच्या कारणावरून छाेट्या भावाने डाेक्यात लाकडाने मारहाण केली. यामध्ये अल्लारखा फकीर (३५) या माेठ्या भावाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात बुधवारी भावाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पाेलिसांनी अटक केली आहे. 

फिर्यादी मुनवर अल्लारखा फकीर (२७, रा. माळेगाव खु., ता. अहमदपूर) यांचे पती अल्लारखा फकीर (३५) हे मंगळवारी घरी हाेते. दरम्यान, अमर फकीर याने माेटारसायकलची (एमएच-२४ एन-९८५३) त्यांना चावी मागितली. यावेळी अल्लारखा यांनी भावाला चावी देण्यास नकार दिला. त्यावरून अमर बाबुमियाँ फकीर याने घरासमाेरील अंगणात ठेवलेल्या सरपणातील लाकडाने अल्लारखा यांच्या डाेक्यात मारहाण केली. या मारहाणीत ते जागीच काेसळले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

सदरची घटना माळेगाव येथील घरासमाेर घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात मृत अल्लारखा यांची पत्नी मुनवर फकीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमर फकीर याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक जे.बी. सराेदे करीत आहेत.

Web Title: Anger further breaks the relationship; Murder of elder brother for not giving motorcycle keys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.