चुलीवर भाकरी भाजून केंद्रावर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST2021-02-12T04:18:59+5:302021-02-12T04:18:59+5:30
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पानफुला पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात महादेवी पाटील, भाग्यश्री सूर्यवंशी, शकुंतला कलशेट्टी, ...

चुलीवर भाकरी भाजून केंद्रावर संताप
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पानफुला पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात महादेवी पाटील, भाग्यश्री सूर्यवंशी, शकुंतला कलशेट्टी, श्यामाबाई गिरी, सविता इंगळे, कोमल इंगळे, रेखाबाई सूर्यवंशी, शीतल बिराजदार, मिराबाई कलशेट्टी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, लक्ष्मण कांबळे, इस्माईल लदाफ, उल्हास सूर्यवंशी, ओम शिंदे, धोंडिबा वाघमारे, प्रवीण कवटकर, कुशाबा कांबळे, उद्धव मेकाले, सय्यद कादरी, रणजित कांबळे, समदलाल टेकडे आदी सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या महिलांनी केंद्र शासनाचा निषेध करीत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी...
गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध करीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. रिकामे सिलिंडर खांद्यावर घेऊन केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उपविभागीय कार्यालयासमोर रिकामे गॅस सिलिंडर ठेवून महिलांनी चुलीवर भाकरी भाजल्या.