Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 00:02 IST2025-08-23T00:01:40+5:302025-08-23T00:02:00+5:30
खरोळा गावात शुक्रवारी दिवसभर बैल पाेळा सणानिमित्त गावातील शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी आपल्या बैलांना, पशुधनांची सजावट करून मिरवणूक काढत हाेते.

Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
राजकुमार जाेंधळे
रेणापूर (जि. लातूर) : बैल पाेळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत फटाक्याच्या आवाजाने एक बैल उधळल्याची घटना खराेळा गावात (ता. रेणापूर) शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी घडली. यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेले, रस्त्यालगत थांबलेले ग्रामस्थ सैरभैर झाले. अचानकपणे बैल उधळल्याने एकच धांदळ, गाेंधळ उडाला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.
खरोळा गावात शुक्रवारी दिवसभर बैल पाेळा सणानिमित्त गावातील शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी आपल्या बैलांना, पशुधनांची सजावट करून मिरवणूक काढत हाेते. दरम्यान, खराेळा गावातीलच शेतकरी संगमेश्वर तत्तापुरे हे आपल्या बैलांना झूल पांघरूण, सजावट करून त्यांची मिरवणूक काढत हाेते. यावेळी साउंडचा माेठा आवाज सुरू हाेता. शिवाय, अचानकपणे फाेडण्यात आलेल्या फटाक्याच्या आवाजाने बैल बिचकला आणि उधळायला. यातून मिरवणुकीत एकच गाेंधळ उडाला. परिणामी, मिरवणूक पाहण्यासाठी चाैकामध्ये जमा झालेले ग्रामस्थ आणि नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. घाबरून आबालवृद्धांसह नागरिकांनी पळ काढला. मिरवणुकीत बिचकलेला, उधळलेला बैल थेट शेतात असलेल्या दावणीकडे गेला. यात काेणतीही माेठी हानी झाली नाही.
लातूरमध्ये बैल पाेळ्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत फटाक्याच्या आवाजाने बैल उधळल्याची घटना #Laturpic.twitter.com/zYAleLHCb7
— Lokmat (@lokmat) August 22, 2025