हंडरगुळीच्या सरपंचपदी अंबेकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST2021-02-09T04:22:05+5:302021-02-09T04:22:05+5:30
पंधरा सदस्य असलेली हंडरगुळी ग्रामपंचायत व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. नुकतीच या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यात बालाजी ...

हंडरगुळीच्या सरपंचपदी अंबेकर यांची निवड
पंधरा सदस्य असलेली हंडरगुळी ग्रामपंचायत व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. नुकतीच या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यात बालाजी भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपरिवर्तन पॅनलने बारा जागा जिंकून बहुमत मिळवले. तर अशोक धुप्पे यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या. सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होते. सोमवारी सरपंच, उपसरपंचाची निवड करण्यात आली. सरपंच व उपसरपंच पदांसाठी केवळ विजय अंबेकर व बालाजी पाटील यांचेच अर्ज आले. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांना सरपंच व उपसरपंच म्हणून जाहीर केले. निवडी प्रसंगी नागोराव चिमनदरे, अंकुश आनलदास, सुनिल कांबळे, ज्ञानेश्वर पिट्टलवाड, राशिदबी चौधरी, फातेमाबी शेख, कुसुम दापके, उर्मिला कांबळे, भाग्यश्री उडतेवार, राजाबाई कांबळे हे सदस्य उपस्थित होते. अध्याशी अधिकारी म्हणून बी.के.धमणसुरे यांनी काम पाहिले. मदतनीस म्हणून ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतीने, तलाठी के.व्ही.गायकवाड हे होते. निवडीनंतर गावकऱ्यांनी पेढे वाटून, फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. हंडरगुळी ग्रामपंचायतीस बाजारामुळे चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे येथील सरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.