कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:22+5:302021-07-02T04:14:22+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा बुधवारी चाकूर पोलीस ठाण्याच्या वतीने सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात ...

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव प्रयत्न
उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा बुधवारी चाकूर पोलीस ठाण्याच्या वतीने सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे होते. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, रेणापूरचे पोलीस निरीक्षक एन.डी. उबाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे, गायत्री काळे, गीता काळे आदी उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी नोकरी केली. परंतु चाकुरातील नोकरी ही संस्मरणीय राहिली. येथील नागरिक अत्यंत संयमी आणि शांत असल्याने येथे मला एक चांगला अनुभव मिळाला. पोलीस खात्यात निष्ठेने काम करीत राहिलो. सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून सतत वेळ दिला. पोलीस खात्यात नोकरी करताना नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील, माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे, पोउपनि खंडू दर्शने, पोहेकॉ. हणमंत आरदवाड, जगन्नाथ भंडे, दिगंबर पडिले, उदयसिंग चव्हाण, मारोती तुडमे, माधव सारोळे, परमेश्वर राख, गोरोबा जोशी, दत्तात्रय थोरमोटे, सुरेश कलमे, तानाजी आरदवाड, अनिरुद्ध भिकाणे, संतोष साठे, दादाराव हाके, अभिजित डोईजड, ज्योतीराम शिंदे, भागवत मामडगे, गणेश बुजारे, संजय भिकाणे, ईश्वर स्वामी, दामोदर सिरसाट, मारोती दापके, दत्तात्रय चामे, हणमंत मस्के, अर्जुन तिडोळे, पूनम शेटे, नूरजहाँ हाश्मी, बालिका हणमंते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. प्रकाश सोमवंशी यांनी केले. आभार पोउपनि. खंडू दर्शने यांनी मानले.