येरोळ परिसरात मुगाच्या राशीची लगबग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:39+5:302021-08-20T04:24:39+5:30
येरोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील शिवारात सध्या मुगाच्या राशीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ...

येरोळ परिसरात मुगाच्या राशीची लगबग!
येरोळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरातील शिवारात सध्या मुगाच्या राशीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मुगाचे उत्पादन घटले असून, एकरी केवळ २५ ते ३० किलोचा उतारा मिळत असल्याचे चित्र आहे.
येरोळसह परिसरात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर मुगाची पेरणी केली होती. मूगही जोमदार बहरला होता. परंतु, ऐन फळधारणा होण्याच्या वेळी पावसाने उघडीप दिल्याने मुगाच्या शेंगामध्ये दानेच भरले नाहीत. ढगाळ वातावरणामुळे पाने पिवळे पडली असून, मुगावर किडीचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे मुगाच्या उत्पादनात घट झाली आहे. केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात मुगाचे एकरी केवळ २५ ते ३० किलोच उत्पादन मिळाले असल्याचे पांढरवाडी, येरोळ येथील शेतकरी रामकृष्ण खटके, वसंतराव गंभीरे यांनी सांगितले. सध्या मृग नक्षत्रात पेरणी झालेल्या मुगाची वेचणी करण्यासाठी शेतशिवारात मजुराची लगबग सुरू आहे. मात्र गतवर्षीपेक्षा उतारात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.