तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
By संदीप शिंदे | Updated: January 3, 2023 18:02 IST2023-01-03T18:01:11+5:302023-01-03T18:02:13+5:30
वनविभागाकडे मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे

तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
किल्लारी (लातूर) : औसा तालुक्यातील किल्लारी येथे असलेल्या तेरणा नदीपात्राच्या कडेला रविवारी मगर आढळून आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावणर असून, वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तेरणा नदीपात्राच्या परिसरात किल्लारी येथील अनेकांची शेतजमीन आहे. सध्या शेतीमध्येशेतकरी रबीच्या कामांत व्यस्त आहेत. त्यातच महावितरणकडून कृषिपंपांना रात्री दि. १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे. त्यातच रविवारी मगर आढळून आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.
वनविभागाने लक्ष देण्याची मागणी...
सध्या शेतीमध्ये रबी पिकांमध्ये मशागतीची कामे सुरू आहेत. शेतात महिला मजुरांकडूनही खुरपणीची कामे केली जात आहेत. रात्रीची लाइट असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. मात्र, रविवारी मगर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांत भीती पसरली आहे.