औराद बाजार समिती संचालक मंडळावरील ते आरोप बिनबुडाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:40+5:302021-07-10T04:14:40+5:30
यावेळी औराद बाजार समितीचे सभापती हाजी सराफ, उपसभापती लक्ष्मण कांबळे, संचालक गंगाधर चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, संजय बडुरे, काँग्रेसच्या अल्पसंख्याक ...

औराद बाजार समिती संचालक मंडळावरील ते आरोप बिनबुडाचे
यावेळी औराद बाजार समितीचे सभापती हाजी सराफ, उपसभापती लक्ष्मण कांबळे, संचालक गंगाधर चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, संजय बडुरे, काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, हसन चाऊस आदी उपस्थित होते.
यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, औराद बाजार समितीच्या संचालक मंडळाने १६ लाख ३७ हजार ६९८ रुपये पूर्णपणे नियमानुसार खर्चिले आहेत. त्यात बाजार समितीच्या ६ लाख रुपयांचे अंतर्गत रस्ते, ९० हजार वेतनासाठी, १ लाख उपचारासाठी, एक लाख सेवकांच्या मुलीच्या विवाहासाठी अनामत, १ लाख २८ हजार कर्मचारी विमा, ६ लाख थकीत पगारावर खर्चिले आहेत. हा खर्च परवानगीने करण्यात आला आहे. मागील काळातील संचालक मंडळाने जवळपास सव्वाकोटी रुपये कशा प्रकारे खर्च केले, याचीही चौकशी होणार आहे, असे ते म्हणाले.
भविष्याबद्दल भाष्य करणे योग्य नाही...
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळेल काय, अशी चर्चा शहरात सुरू आहे. याबद्दल अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, लोकशाहीत कोणी कोणत्या पक्षात राहावे, हा त्यांचा प्रश्न आहे. यावर मी काही भाष्य करणार नाही. तेव्हा पत्रकारांनी आपण राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे, असे म्हटले असता ते म्हणाले, राजकारणामध्ये कधी काय घडेल, भविष्यातील गणिते काय असतील, याबद्दल आज भाष्य करणे योग्य नाही.